Dr. B.R. Ambedkar, His Thoughts, His Life, Works, Writings and Speeches. Readers are requested to kindly go through the references mentioned herein; and also the other relevant sources. Thanks. Jai Bhim.
धर्मास ग्लानी का येते?
बौद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होईल
जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय
बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्सची राज्यक्रांती या महत्त्वाच्या घटना
तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी
धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग
मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे
धर्माची आवश्यकता गरिबांना आहे
मनुष्याच्या मनुष्यत्वाला व माणुसकीला किंमत नाही तो धर्म काय कामाचा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मुक्ती कोन पथे?" या ऐतिहासिक भाषणातून (13 ऑक्टोबर 1935, येवले, महाराष्ट्र)
"या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महारची आणि स्वच्छ राहणार्या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही, तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही, त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करु नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे?" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(खंड 18, भाग 1)
गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य
धर्माची तपासणी करता आली पाहिजे
विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे
मनुष्याने स्वार्थच करीत न राहता परार्थही केला पाहिजे
अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही
********************************************
हैद्राबादच्या मुक्कामात दि. १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड' तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे केलेले भाषण:
********************************************
#बाबासाहेब #आंबेडकर
************
जनता: २० नोव्हेंबर १९५४
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************
सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे
********************************************
मार्च १९४७
************
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणातून:
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)