गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे ~डॉ. बी. आर. आंबेडकर
*******************************
"बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर निर्णयाचा एक दिवस (Day of Judgement) असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे." ~डॉ. बी. आर. आंबेडकर
No comments:
Post a Comment
Suggestions are most welcome