Showing posts with label लोकशाही. Show all posts
Showing posts with label लोकशाही. Show all posts

जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतीबा फुलेंचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही पक्षाला, जनतेच्या सर्वांगीण हितासाठी जोतीबा फुलेंचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
***********************************
नाशिक, १७ नोव्हेंबर १९५१
"जोतीबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की, मीच तेवढा खरा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की ह्या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील ८० टक्के लोकांस विद्याप्राप्ती करु न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गांच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे."
***********************************
जनता: ८ व १५ डिसेंबर १९५१
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************
#बाबासाहेब #आंबेडकर #जयंती_2019
***********************************

सामाजिक विषमता लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत

सामाजिक विषमता लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

"जर तुम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केलीत तर तुम्हाला असे आढळून येईल की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे, याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
(१९५२)
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

#बाबासाहेब #आंबेडकर #जयंती_२०१९