Showing posts with label भांडवलदार. Show all posts
Showing posts with label भांडवलदार. Show all posts

या देशातून एकवेळ इंग्रज जातील, पण धनिक भांडवलदार...

या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. तो कॉंग्रेसमध्ये सामील झाला म्हणून त्याची रक्तशोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्याची भरमसाट व्याज घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्याची गोरगरिबांच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही.

~डॉ. बाबासाहेब आंबेडकर