Showing posts with label समाजकार्य. Show all posts
Showing posts with label समाजकार्य. Show all posts

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्यबुद्धीने झटले पाहिजे

"आपला समाज आज सर्वतोपरी मागासलेला आहे. द्रव्याने मागासलेला आहे. मनोधैर्याने मागासलेला आहे. ज्या समाजातील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता व अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे. ज्यातील सार्‍या लोकास गूढ अज्ञानाने व्यापिले आहे. ज्यास विपत्तिपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही, त्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता येणे फार कठीण आहे. यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल व ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधवहो! जर तुम्हाला इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बार्शी, जिल्हा सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे 1924 मध्ये झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण. (ज्ञानप्रकाश, 24 मे 1924 व 7 जून 1924)

(खंड 18, भाग 1)

Advice on Economic Inequalities

"The attention of the Anti- Untouchability League and workers in the same cause should be directed more to the economic, educational and social improvement of the untouchables rather than to temple entry and inter-dining. Public opinion should be mobilised by them to throw open wells and to admit Untouchable children to Public Schools."
-Dr. Babasaheb Ambedkar

(The Times of India, 19.10.1932)

मनुष्याने स्वार्थच करीत न राहता परार्थही केला पाहिजे

मनुष्याने स्वार्थच करीत न राहता परार्थही केला पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
"मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरुरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. "कबीर कहे कुछ उद्दम कीजे। आप खाये और औरनको दीजे।" या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा, आपण खा व दुसऱ्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा."


************

३ जून १९५३
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************