"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
Dr. B.R. Ambedkar, His Thoughts, His Life, Works, Writings and Speeches. Readers are requested to kindly go through the references mentioned herein; and also the other relevant sources. Thanks. Jai Bhim.
बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल
डॉ. आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत
(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस दुसरा. या दिवशी झालेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या ऐतिहासिक भाषणातून...)
"... मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करितो की, आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते!"
"...आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे? विद्वानांत ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो."
"माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते." ~राजर्षी शाहू महाराज
माणगाव, 22 मार्च 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही उन्नतीची आद्य कारणे
*"आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ अपूर्व आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*
(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस पहिला. ~याच माणगावच्या परिषदेत दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे भाषण झाले.)
"ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या जातीबद्दल दिसून येत असलेली कळकळ ही देखील तितकीच अपूर्व आहे. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे.
माणगाव, 21 मार्च 1920
**********
मूकनायक: 10 एप्रिल 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे
DBAWS- 1
Published by Dr. Babasaheb Ambedkar Source Material Publication Committee,
*********************
Vol. 1 to Vol. 22
(Vol. 18(~3 parts), vol. 19 and vol. 20 are in Marathi language)
Vol. 2 (Marathi)
******************************
Special issue on the occasion of Diamond Jubilee of the book:
At:
1. Annihilation of Caste
2. जातीव्यवस्थेचे निर्मूलन
(मराठी translation of AoC)******************************
Ground Floor, Government Book Depot & Publication House,
Netaji Subhash Chandra Bose Road, Mumbai, 400 004.
(Charni Road)
Civil Lines, Nagpur, 440 001.
Shaha Ganj, Near Gandhi Chowk,
Aurangabad. 431 001.
5. Govt. Press and Stationery Stores, Kolhapur.
टीका करण्याचा हक्क कोणाचा?
"टीका करण्याचा हक्क कोणाचा? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला-मारणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार नाही. ......म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलं. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. आम्ही आमच्या पायावर उभे राहू." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
धर्मास ग्लानी का येते?
Cost of Education
ON GRANTS FOR EDUCATION, 12th March 1927
"Going over the figures which give us information as to the manner by which we finance education in this presidency, I find that out of the total expenditure which we incur on arts colleges, something like 36% is financed from fees; out of the expenditure that we incur on high schools something like 31% is financed from fees; out of the expenditure that we incur on middle schools, something like 26% is derived from fees. Now, Sir, I submit that this is commercialisation of education. Education is something which ought to be brought within the reach of everyone. The education department is not a department which can be treated on the basis of 'quid pro quo'. Education ought to be cheapened in all possible ways and to the greatest possible extent. I urge this plea because I feel that we are arriving at a stage when the lower orders of society are just getting into the high schools, middle schools and colleges, and the policy of this department therefore ought to be to make higher education as cheap to the lower classes as it can possibly be made." ~Dr. Babasaheb Ambedkar
DBAWS, Vol. 2
I must do my duty
"However strong and however filthy be the abuses which the Congress Press chooses to shower on me I must do my duty. I am no worshipper of idols. I believe in breaking them. I insist that if I hate Mr Gandhi and Mr Jinnah-- I dislike them, I do not hate them-- it is because I love India more. That is the true faith of a nationalist. I have hopes that my countrymen will some day learn that the country is greater than the men, that the worship of Mr. Gandhi or Mr. Jinnah and Service to India are two very different things and may even be contradictory of each other."~ Dr. Babasaheb Ambedkar, 15th March 1943
DBAWS, Vol. 1
