"Man is mortal. Everyone is to die someday or other. But one must resolve to lay down one's life in enriching the noble ideals of self-respect and in bettering human life. We are not slaves. We are a warrior clan. Nothing is more disgraceful for a brave man than to live a life devoid of self-respect without love for the country." ~ Dr. B. R. Ambedkar
Dr. B.R. Ambedkar, His Thoughts, His Life, Works, Writings and Speeches. Readers are requested to kindly go through the references mentioned herein; and also the other relevant sources. Thanks. Jai Bhim.
बहिष्कृत विद्यार्थी व बहिष्कृतांचे भवितव्य
बहिष्कृत विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडण्यावर बहिष्कृतांचे भवितव्य अवलंबून आहे.
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
या देशातून एकवेळ इंग्रज जातील, पण धनिक भांडवलदार...
या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. तो कॉंग्रेसमध्ये सामील झाला म्हणून त्याची रक्तशोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्याची भरमसाट व्याज घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्याची गोरगरिबांच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही.
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नेहमीच जुने ते सोने म्हणून चालणार नाही
सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्यांच्या मुलांनी करावे हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदललल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण कधीही समर्थ होणार नाही. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगतीबरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे अवश्य आहे. तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. विधायक कार्य केल्याशिवाय इतका वेळ गेला आहे की जास्त वेळ जाऊ देणे हे आपल्या बर्याचे होणार नाही. या प्रांतातील आपल्या लोकांत शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही.
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Education is a Serious matter and Not a Tea Time Enjoyment
DBAWS, Vol. 17, Part III (2nd Jan 1945, Calcutta,
address to students of Scheduled Castes)
Dr. Babasaheb Ambedkar advised the students not only to get
degree but to see that the degree carried with it some positive knowledge or
attainment, that they had qualifications which they called 'sterling.'
They must regard education as a serious matter and
not a tea-time enjoyment.
गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य
गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे ~डॉ. बी. आर. आंबेडकर
*******************************
"बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर निर्णयाचा एक दिवस (Day of Judgement) असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे." ~डॉ. बी. आर. आंबेडकर
प्रगतीचा मार्ग
समतेच्या झगड्यात वरच्यास खाली लोटण्याऐवजी खालच्यास वर
ओढणे हाच प्रगतीचा मार्ग विशेष श्रेयस्कर आहे.
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ३० सप्टेंबर १९२७
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ३० सप्टेंबर १९२७
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९)
***********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९)
***********************************
धर्माची तपासणी करता आली पाहिजे
प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता
आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानात आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो.
तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही हे पाहता की, हे सोने खरे आहे
की खोटे? हे समजण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून
पाहण्यात येतो. तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे.
धर्मतत्त्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म
माणसाला सुखसमाधान देऊ शकेल?
~ डॉ. बाबासाहेब
आंबेडकर. २३ जून, १९५६, दिल्ली.
Dr. Babasaheb Ambedkar and Karmavir Bhaurao Patil
"I am extremely happy to have been able to pay this visit to the Hostel. It is an unique institution and deserves support of every man who cares for the best interests of this nation. Every credit is due to my friend Bhaurao Patil. I am paying Rs. 20/- to this institution."
Satara:
29-07-1928 Sd./- B. R. Ambedkar
DBAWS Vol. 17, Part 1
(This is the remarks Dr. Babasaheb Ambedkar had written during his visit to the hostel run by the institution of the Great Social Reformer and Educationist Karmaveer Bhaurao Patil.)
Advice on Economic Inequalities
"The attention of the Anti- Untouchability League and workers in the same cause should be directed more to the economic, educational and social improvement of the untouchables rather than to temple entry and inter-dining. Public opinion should be mobilised by them to throw open wells and to admit Untouchable children to Public Schools."
-Dr. Babasaheb Ambedkar
(The Times of India, 19.10.1932)
Subscribe to:
Posts (Atom)