मनुष्याच्या मनुष्यत्वाला व माणुसकीला किंमत नाही तो धर्म काय कामाचा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मुक्ती कोन पथे?" या ऐतिहासिक भाषणातून (13 ऑक्टोबर 1935, येवले, महाराष्ट्र)

"या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महारची आणि स्वच्छ राहणार्‍या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही, तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही, त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करु नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे?" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(खंड 18, भाग 1)

अन्यायाची जाणीव कशी होणार?

मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणातून (मे 1924, बार्शी, जि. सोलापूर)

"अमुक एक गोष्ट (जातिभेदामुळे) करता येत नाही वगैरे आवेशयुक्त बोल ऐकून (आपल्या लोकांना) त्वेष येत नाही; याचे कारण त्यांना या अन्यायाची जाणीव होत नाही. मनुष्य एखाद्या हुद्द्यावर चढण्यास लायक असताना जर त्याला जातिभेदांमुळे तो हुद्दा प्राप्त होत नाही, तर तशा माणसाला जातीभेद कसा नडतो हे त्याला कळू लागेल व त्याला आपल्या चळवळीचे मार्ग कळून तो तिचा पुरस्कर्ता होईल. पण ज्याला त्या जागेवर जाण्याची लायकी नसेल, तर त्याला जातीभेदाचे उग्र स्वरूप कसे कळणार? जातीभेद असला काय आणि नसला काय, तो आहे तिथेच राहणार. म्हणून आपल्या लोकांची लायकी वाढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे."

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

(खंड 18, भाग 1)

आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी काम करणार आहे

"मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन, एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा."

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९२४, मुंबई. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सक्रिय सभासदांना उद्देशून. आपापसात तेढ निर्माण होऊ देऊ नका, हे सांगताना...)

The Path of Social Reform

Dr. B. R. Ambedkar in "Annihilation of Caste"

    ~"The path of social reform like the path to heaven at any rate in India, is strewn with many difficulties. Social reform in India has few friends and many critics." ~Dr. B. R. Ambedkar

Intellectual class from each strata of Society

Dr. B. R. Ambedkar in 'Revolution and Counter-Revolution in Ancient India':

     ~A purely intellectual class, free to consider general good and having no interest of a class to consider, such as the one contemplated by Buddha is not to be had anywhere. For the limitations resulting from property on the freedom of intellect of the elite have not been generally realized until very recently. But this want of an intellectual class has been made good in other countries by the fact that in those countries each Strata of Society has its educated class. There is safety, if no definite guidance, in the multiplicity of views expressed by different educated classes drawn from different strata of society. In such a multiplicity of views there is no danger of society being misguided or misdirected by the views of one single educated class drawn from one single strata of society and which is naturally bound to place the interest of its class before the interests of the country.

Be Watchful, Strong, Well Educated, Self Respecting

"Remember that it is not enough that people are numerically in majority. They must be always watchful, strong, well-educated and self-respecting to attain and maintain success."

~Dr. Babasaheb Ambedkar, 1933

***********************************
(Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches; Vol. 17, Part 3)
***********************************

Ambition- They alone rise who strive

"You should always cherish some ambition to do something in this world. They alone rise who strive." ~Dr. B. R. Ambedkar

DBAWS, Vol. 17, Part I

Believe in your strength

"Do not believe in fate. Believe in your strength." ~Dr. B. R. Ambedkar 

(Janata Dt. 25 Feb 1933)

DBAWS, Vol. 17, Part III

Hope from Younger Generation

"I am not hopeful of the younger generation which seems to be more pre-disposed to pleasure seeking and not possessing much of idealism and is not likely to produce men of ideals." ~Dr. B. R. Ambedkar

DBAWS, Vol. 17, Part III

Value of the Library

"It is unfortunate that we have not yet realised the value of the library as an institution in the growth and advancement of a society." ~(Dr. B. R. Ambedkar)

DBAWS, Vol. 17, Part I (Dr. B. R. Ambedkar, in a letter sent for publication while he was a student of Columbia University in 1916- Bombay Chronicle, 28th March 1916)