आधी राजकीय मग सामाजिक ही मीमांसा नादानपणाची

बेळगांव जिल्ह्यातील निपाणी गावी "मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषद: अधिवेशन तिसरे" या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून. (दि. 11 एप्रिल 1925)
वैकम सत्याग्रहाच्या संदर्भाने बाबासाहेबांनी हे विचार मांडले:
"आधी राजकीय मग सामाजिक, ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती बाब येत असेल तर ती सामाजिकच होय. सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूस ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरांस घेण्यास लाविले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूस टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीच बिकट करून टाकली. यास आजची परिस्थिती साक्ष देत आहे. तो सामाजिक प्रश्न त्यांनी वेळीच हाती घेतला असता तर आज सर्वत्र दिसून येत असलेली तेढ व दुही दृष्टीस पडती ना!" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
 **********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome